शेतकऱ्यांत दहशत : तत्काळ बंदोबस्त करण्याची मागणी
गडचिरोली : पोर्ला वनपरिक्षेत्रातील चुरचुरा उपक्षेत्राच्या जंगलातून मरेगाव बिटातील देलोडा परिसरात हत्तींनी सोमवारी प्रवेश केला. येथे एक दिवस धुडगूस घातल्यानंतर हत्तींच्या कळपाने पुन्हा चुरचुरा चेक परिसरात पुनरागमन केले. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांची धाकधूक पुन्हा वाढलेली आहे.
हत्तींचा कळप १० दिवसांपूर्वी गडचिरोली वन विभागातून दिभनाच्या जंगलात दाखल झाला होता. या कळपाने दिभना, जेप्रा, कळमटोला, धुंडेशिवणी व पिपरटोला भागातील शेतकऱ्यांच्या धान पिकाची नासधूस करीत चुरचुरा जंगल परिसरात प्रवेश केला. या भागात तीन ते चार दिवस धान पिकावर ताव मारला. पुन्हा हा कळप नवरगावमार्गे देलोडा बिटात सोमवारी दाखल झाला. येथे एक दिवस शेतकऱ्यांच्या पिकाची नासाडी केल्यानंतर हा कळप पुढे सिर्सी बिटात जाईल, असे वाटत होते; परंतु हत्तींनी आपला मोर्चा चुरचुराकडे वळविला.
कापणीला आलेले धानपीक हिरावतोय कळप
सध्या अल्प मुदतीच्या व मध्यम प्रतिच्या धानाची कापणी व बांधणी सुरू आहे. काही भागांत अल्प मुदतीच्या धान पिकाची मळणीसुद्धा सुरू झालेली आहे. अशातच शेतकऱ्यांच्या हातात येणाऱ्या उभ्या पिकांवरही हत्तींचा कळप ताव मारत असल्याने शेतकरी त्रस्त आहेत. चुरचुरा व देलोडा भागातील अनेक शेतकऱ्यांच्या धान पिकाची नासधूस हत्तींच्या कळपाने केलेली आहे.
कळपाचे तळ्यात मळ्यात
रानटी हत्तींचा कळप दोन दिवसांपूर्वी पाल नदी ओलांडून मरेगाव उपक्षेत्रातील देलोडा परिसरात दाखल झाला; परंतु, तेथील वातावरण कळपाला मानवले नसावे. पुन्हा हा कळप चुरचुरा चेक परिसरात मागे फिरला. यामुळे या कळपाचे सध्यातरी तळ्यात मळ्यात दिसून येत आहे.
चामोर्शी : रानटी टस्कर हत्तीसोबत सेल्फी काढण्याचा नाद एका मजुराच्या जिवावरच बेतला. टस्कर हत्तीने हल्ला करून या मजुराला चिरडून जागीच ठार केले. ही घटना चामोर्शी तालुक्याच्या आबापूर जंगलात आज सकाळी ८:३० वाजेच्या सुमारास घडली.
श्रीकांत रामचंद्र सतरे (२३, रा. नवेगाव, भुजला, ता. मूल, जि. चंद्रपूर) असे ठार झालेल्या मजुराचे नाव आहे. गडचिरोली जिल्ह्यात केबल टाकण्याचे काम करण्याकरिता नवेगाव येथून श्रीकांत सतरे हे आपल्या काही सोबत्यांसह आले होते. गडचिरोली वनविभागातील कुनघाडा रै. वन परिक्षेत्रांतर्गत आबापूर गाव परिसरातच हे काम सुरू होते. दरम्यान, २३ ऑक्टोबर रोजी चातगाव व गडचिरोली वन परिक्षेत्रातून रानटी टस्कर हत्तीने कुनघाडा रै. वन परिक्षेत्रात प्रवेश केलेला होता. नियत क्षेत्र मुतनूर वनक्षेत्रातील आबापूर जंगलात टस्कर हत्ती वावरत असल्याची माहिती केबल टाकणाऱ्या मजुरांना मिळाली व त्यापैकी तिघेजण हत्ती पाहायला गुरुवारी सकाळीच गेले होते.
पळ काढल्याने वाचला दोघांचा जीव
हत्ती दूरवरच असताना श्रीकांत हा हत्तीसोबत सेल्फी काढण्यात मग्न असतानाच हत्तीने हल्ला करून त्याला चिरडले. तोपर्यंत अन्य दोघेजण तेथून पळ काढत आपला जीव वाचविण्यात यशस्वी झाले. हे मजूर केबल टाकण्याचे काम करण्याकरिता चंद्रपूर जिल्ह्यातून गडचिरोली जिल्ह्यात आले होते.
गडचिरोली जिल्ह्यात मागील दोन वर्षापासून हौदोस घालणारे जंगली हत्ती गडचिरोली शहरापर्यंत पोहचले आहे.
आज रात्री शहरालगत असलेल्या सेमाना देवस्थान जवळ जंगली हत्ती राष्ट्रीय मार्गावर आले आहे. यामुळे हा मार्ग बंद करण्यात आला असून येथे या मार्गावर प्रवास करणाऱ्याना जंगली हत्तीचे दर्शन झाले आहे. या वेळी वन विभाग कडून चोख बंदोबस्त ठेवण्यात येत असून तुतास नागरिकांना ध्वनीक्षेपण द्वारे आव्हान करण्यात येत आहे.
या लिंक वर आपणाला हत्ती पाहायला मिळेल.
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
https://youtu.be/FWqNE9TRHXs?si=wgVbf7UyghYkAU_V
सदर हत्तीच्या कळप मध्ये २२ हत्ती असल्याची सूत्राकडून माहिती मिळाली आहे. सकाळी मोर्निंग वाक करिता जाणाऱ्यानी स्वताची सुरक्षेची काळजी घ्यावी. हत्तीचा मुक्काम किती काळ राहणार हे पाहणे आवश्यक आहे, सदर हत्ती हे ओरिसा राज्यातून आले आहे. या जिल्ह्यतील वातावरण त्यांना मानवले असल्याने त्यांचा या जिल्ह्यत कायमचा मुक्काम रराहण्याची शक्यता आहे.
कोरची,. कोरची तालुक्यात अस्वलीने धुमाकूळ घातला आहे. अस्वलीच्या हल्ल्यात एकाच दिवसात तिघे जखमी झाले आहेत. त्यामुळे तालुक्यात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शुक्रवारी (दि. 23) सकाळी 8 वाजता कोरची तालुक्यातील गडेली गावालगत असलेल्या कक्ष क्रमांक 456 मध्ये अस्वलाने 3 लोकांवर हल्ला केल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच गडेली गावात जावून तिन्ही जखमींना शासकीय वाहनाद्वारे कोरची येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय उपचारार्थ भरती करण्यात आले. अस्वलाच्या हल्ल्यात चम्मा पंडी नैताम (वय 55, रा. गडेली) हा इसम गंभीररित्या जखमी झाला. त्याच्या डोके, उजवा हात तसेच डाव्या पायाला गंभीर जखमा झाल्या. तर महादू सीताराम कोरेटीवय 58, रा. गडेली) याच्या उजव्या हाताला किरकोळ स्वरूपाची जखम झाली. दुसऱ्या घटनेत रामसिंग पलटन सोनकुकरा (वय 55, रा. टेमली)याच्यावरसुद्धा अस्वलीने हल्ला करूनत्याला गंभीररित्या जखमी केले. सदर घटना ही शेतमालकाच्या शेताला लागून असलेल्या जंगलामध्ये घडली. त्यांच्या पाठीवर दोन ठिकाणी किरकोळ जखमा आढळल्या. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चम्मा पंडी नैताम हा गंभीर जखमी असल्यामुळे त्याला गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. या घटनांचा पंचनामा करतेवेळी बेडगावचे वनपरिक्षेत्र अधिकारी एल. एम. ठाकरे, क्षेत्र सहायक एस. एन. राठोड, गडेलीचे वनरक्षक एस. बी. भिमटे, कालापाणीचे वनरक्षक पी. एम. मगरे, जितेंद्र राऊत उपस्थित होते.
सध्या जंगलात मोठ्या प्रमाणात बांबू वास्ते व मशरूम उगवलेले आहेत. लोक सकाळच्या सुमाराला वास्ते व मशरूम तोडण्याकरिता जातात. जंगलात अस्वल तसेच इतर हिस्त्र जंगली प्राणी वावरत आहेत. हिस्त्र प्राणी असलेल्या भागात वास्ते व मशरूम तोडण्याकरिता नागरिकांनी जावू नये. तसेच योग्य खबरदारी घ्यावी.
- एल. एम. ठाकरे, वनपरिक्षेत्र अधिकारी, बेडगाव.
मका, उन्हाळी धान पिकाचे नुकसान
गडचिरोली, ब्युरो. देसाईगंज वनविभागाअंतर्गत येणाऱ्या आरमोरी वनपरिक्षेत्रातील पळसगाव उपवनक्षेत्रातील शेतशिवारात शुक्रवारी रात्री जंगली हत्तींनी पुन्हा एकदा हैदोस माजविला. हत्तींच्या कळपाने शेतात लावलेले मका व उन्हाळी धानपीक पूर्णपणे उद्धवस्त केले. या घटनेमुळे पळसगाव येथील 5 ते 6 शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
गेल्या काही दिवसांपासून या परिसरात हत्तींचा कळप शिरल्याने शेतकऱ्यांचे दररोज नुकसान होत आहे. खरीप हंगामात झालेले नुकसान भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांनी यंदाच्या रब्बी हंगामात विविध प्रकारच्या पिकांची लागवड केली आहे. मात्र आता ही पिके जंगली हत्तींनी उद्धवस्त केल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. 3 वर्षांपूर्वी ओरिसा राज्यातील जंगली हत्तींचा कळप गडचिरोलीत दाखल झाला होता. तेव्हापासून या हत्तींकडून जिल्ह्यातील विविध भागात नुकसान केले जात आहे. देसाईगंज वनविभाग अंतर्गत येणाऱ्या आरमोरी, कुरखेडा व देसाईगंज
वनपरिक्षेत्रातील जंगलात गेल्या दीड महिन्यांपासून हत्तींचा कळप धुमाकूळ घालत आहे. शुक्रवारी रात्री हा कळप पळसगावला लागून असलेल्या शेतात शिरला. हत्तींनी गावातील 5 ते 6 शेतकऱ्यांच्या शेतात शिरून मका व भातपीक तुडवले. शेतात सर्वत्र हत्तींच्या पावलांचे ठसे दिसून येत आहेत. शनिवारी वनविभागाच्या पथकाने संबंधित शेतात पोहोचून नुकसानीचा पंचनामा केला. सततच्या नुकसानीमुळे परिसरातील शेतकरी संकटात सापडल्याचे दिसून येत आहे.
२४ युनिटची विक्री : ७ कोटी १२ लाख रुपयांची वन विभागाला मिळणार रॉयल्टी
गडचिरोली : तेंदूपत्ता विक्रीतून प्राप्त होणारी संपूर्ण रॉयल्टीची रक्कम मजुरांना बोनसच्या स्वरूपात वनविभागामार्फत वितरित केली जाते. २४ तेंदूपत्ता युनिटचा लिलाव नुकताच पार पडला आहे. त्यामध्ये मागील वर्षीच्या तुलनेत दुप्पट रॉयल्टी मिळणार आहे. त्यामुळे तेंदूपत्त्याचे संकलन करणाऱ्या मजुरांनाही यावर्षी दुप्पट रक्कम मिळेल.
पूर्वी जिल्हाभरातील तेंदूपत्ता वनविभागामार्फत संकलित केला जात होता. मात्र पेसा कायद्याची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर तेंदूपत्ता संकलनाचे अधिकार ग्रामसभांना देण्यात आले आहेत. जे जंगल पेसा अंतर्गत येत नाही. केवळ वैथालाच तेंदूपत्ता संकलनाचे अधिकार वनविभागाला आहेत.
गडचिरोली जिल्ह्यात वनविभागाचे आता २५ युनिट आहेत. त्यापैकी २१ युनिटचा लिलाव १४ फेब्रुवारी रोजी झाला, तर तीन युनिटचा लिलाव २१ फेब्रुवारीला झाला. या सर्व युनिटच्या विक्रीतून वनविभागाकडे सुमारे ७ कोटी १२ लाख रुपयांची रॉयल्टी जमा होणार आहे. मागील वर्षी या २४ युनिटच्या विक्रीतून केवळ ४ कोटी रुपयांची रॉयल्टी मिळाली होता. यावर्षी रॉयल्टी दुप्पट झाल्याने बोनसही दुप्पट मिळणार आहे. पेसा अंतर्गतही तेंदूपत्त्याचे संकलन केले जाते. मात्र, ग्रामसभांची अनेक कंत्राटदारांनी फसवणूक केली आहे. त्यामुळे मजूर आता वन विभागाच्या मार्फत तेंदूपत्ता संकलनाकडे वळत आहेत.
३६ हजार ९०० बॅगचे उद्दिष्ट
विक्री झालेल्या २४ युनिटमधून ३६ हजार ९०० स्टैंडर्ड बैंग तेंदूपत्ता संकलनाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. हा वनविभागाचा अंदाज असतो. त्यामध्ये थोड्याफार प्रमाणात कमीअधिक संकलन होऊ शकते.
मजुरी ३ हजार ९०० रुपये
प्रती स्टैंडर्ड बॅग (एक हजार तेंदूपत्त्यासाठी) किमान ३ हजार ९०० रुपये मजुरी देणे बंधनकारक करण्यात आले आहे. कंत्राटदार यापेक्षा अधिक मजुरी देऊ शकते. मात्र त्यापेक्षा कमी मजुरी देऊ शकत नाही, अन्यथा संबधित कंत्राटदारावर कारवाई केली जाते.
जानेवारीत होणार बोनसचे वितरण
रॉयल्टीची रक्कम कंत्राटदार सप्टेंबर, ऑक्टोबर व नोव्हेंबर या तीन महिन्यात तीन हप्त्यांमध्ये जमा करतात. त्यानंतर लगेच वनविभाग बोनसची रक्कम वितरण करण्यास सुरुवात करते. जवळपास डिसेंबर महिन्यापासून बोनसचे वितरण होईल.
वाघाच्या भीतीने एक युनिट विक्री लांबली
वडसा युनिटमध्ये वाघ व हत्तींची दहशत आहे. परिणामी या युनिटची मागील वर्षी विकी झाली नव्हती. यावर्षीही अजूनपर्यंत विक्री झाली नाही. आता २८ फेब्रुवारी रोजी लिलाव ठेवला आहे.
या दिवशी तरी हा युनिट विकला जाणार की नाही, २ याकडे वनविभागाचे लक्ष लागले आहे. वाघाच्यादहशतीमुळे या जंगलातून तेंदूपत्ता संकलन करण्यास मजूर तयार होत नाही. त्यामुळे कंत्राटदार सदर युनिट खरेदी करीत नाही.